PSI Success Stories: कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या बापाचा मुलगा जिद्दीने बनला फौजदार
“ रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर....... डोळ्यांत जरी गेली धूळ , थांबण्यास उसंत नाही........ येतील वादळे , खेटेल तुफान तरी वाट चालतो......... अडथळ्यांना भिऊन अडखळणे , पावलांना पसंद नाही.......” या कवी सुरेश भट यांच्या ओळी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील किशोर बंडू सादुलवार या युवकाने संघर्षाने सिद्ध केल्या आहेत. किशोर याने जिद्द , चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या आधारावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घालून कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने मिळवलेल्या यशाने संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अतिशय कठीण समजले जाते . अनेकदा आयुष्यातील अनेक वर्ष अभ्यासात घालूनही निराशा पदरी पडत असते. म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अलीकडे हुशारी पेक्षा संयम, सातत्य आणि संघर्षाची परीक्षा समजली जाते. किशोरने देखील...