देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे चित्तरंजन दास ते क्रांतिकारक अरविंद घोष यांना देशद्रोहाच्या आरोपातून निर्दोष सिध्द करणारे बँरिस्टर चित्तरंजन दास यांचा धगधगता इतिहास .
इतिहासात चित्तरंजन दास यांच्या व्यक्तिमत्वाचे नानाविध कंगोरे आपल्याला दिसून येतात, त्यातील क्रांतिकारक अरविंद घोष यांच्या खटल्यातील त्यांचे काम म्हणजे समर्पण आणि बलिदानाचे उत्कृष्ट नमुनाच होता.
> कोण होते चित्तरंजन दास ?
चित्तरंजन दास हे बंगाल मधील थोर स्वातंत्र्यसेनानी आणि कॉंग्रेस चे सक्रीय सदस्य होते. बंगालच्या घराघरात त्यांची कीर्ती पसरलेली होती. ते स्वतः महान कायदेपंडित तथा बँरिस्टर होते. अरविंद घोष यांच्यावर ब्रिटीश सरकारने देशद्रोहाचा खटला भरला होता तेव्हा बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी त्यांचा बचाव केला होता. बँरिस्टर चित्तरंजन दास हे कॉंग्रेस चे अध्यक्षपद भूषविलेले व्यक्तिमत्व होते.
तसेच बँरिस्टर चित्तरंजन दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे गुरु देखील होते.
> बँरिस्टर चित्तरंजन दास आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंध
बँरिस्टर चित्तरंजन दास आणि महात्मा गांधी यांचे संबंध हे स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून घडत आलेले होते. महात्मा गांधी यांचा बँरिस्टर चित्तरंजन दास यांच्यावर विशेष विश्वास होता. महात्मा गांधी म्हणाले होते कि, बंगालची जबाबदारी मी चित्तरंजन दास यांच्यावर सोपवली आहे. आणि त्यांनी ती उत्तमपणे सांभाळली देखील आहे. बंगाल मध्ये बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी कार्यकर्त्यांची उत्तम फळी निर्माण केली आहे, त्यामुळे पुढील ३० ते ४० वर्ष देखील बंगाल प्रांतात कार्यकर्त्यांची वानवा भासणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस हे अनमोल रत्न देखील दासांनीच देशाला दिले आहे. तत्कालीन काळी बंगाल इतकी राष्ट्रीय चळवळ देशात कोणत्याच प्रांतात सक्रीय नव्हती.
> अरविंद घोष आणि बँरिस्टर चित्तरंजन दास .
अरविंद घोष यांच्यावर ब्रिटीश सरकारने देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यातून वाचणे जवळपास अशक्य होते. देश अरविंद घोष सारख्या महान क्रांतीकारकाला मुकतो कि काय अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असताना बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी खटल्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. अरविंद घोष यांच्या बचावासाठी बंगालच्या घराघरातून सार्वजनिक वर्गणी गोळा करण्यात आली. जनवर्गणी संपल्यावर बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी आपली स्वताची शोभिवंत बग्गी आणि घोडा विकला. ते स्वता कफल्लक झाले ते अरविंद घोष यांना वाचविण्याच्या एकाच वेडापायी.
सलग दहा महिने रात्रंदिवस अभ्यास करत त्यांनी अरविंद घोष यांच्या बचावासाठी जोरदार तयारी केलेली होती. कड्या निर्धाराने एखाद्या पर्वता सारखे अभेद्यपणे ते कोर्टात अरविंद घोष यांचा बचाव करत होते . सलग ९ दिवस त्यांच्या बचावाचे भाषण सुरु होते. शेवटच्या दिवशी ते चक्कर येवून पडतात कि काय ? अशी भीती आरोपी आणि खुद्द न्यायाधीश मोह्दायांना देखील निर्माण झाली होती.
अखेर क्रांतिकारक अरविंद घोष यांची निर्दोष मुक्तता झाली. त्याच त्या एका खटल्याने क्षणामध्ये बँरिस्टर चित्तरंजन दास यांना राष्ट्रीय कीर्तीचे वकील म्हणून शिखरावर नेले.
> बँरिस्टर चित्तरंजन दास यांना देशबंधू नाव कसे पडले ?
नागपूर कॉंग्रेस मध्ये बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी महात्मा गांधी यांच्या साक्षीने आपली दरमहा ५० हजाराची वकिली सोडायचा संकल्प केला. त्याच सभेत आपली सर्व संपत्ती राष्ट्राला दान करण्याचा निर्णय दासबाबूंनी जाहीर केला तेव्हा एक कार्यकर्ता ओरडला __ " वा रे वा देशबंधू " तेव्हापासूनच ते सर्वांचे देशबंधू झाले.
अशाप्रकारे बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून आपला देह झिजवला .
.jpeg)


.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा