PSI Success Stories: कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या बापाचा मुलगा जिद्दीने बनला फौजदार

 


“ रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर.......


डोळ्यांत जरी गेली धूळ , थांबण्यास उसंत नाही........


येतील वादळे , खेटेल तुफान तरी वाट चालतो.........


अडथळ्यांना भिऊन अडखळणे , पावलांना पसंद नाही.......”


           या कवी सुरेश भट यांच्या ओळी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील किशोर बंडू सादुलवार या युवकाने संघर्षाने सिद्ध केल्या आहेत. किशोर याने जिद्द , चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या आधारावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घालून कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने मिळवलेल्या यशाने संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अतिशय कठीण समजले जाते . अनेकदा आयुष्यातील अनेक वर्ष अभ्यासात घालूनही निराशा पदरी पडत असते. म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अलीकडे हुशारी पेक्षा संयम, सातत्य आणि संघर्षाची परीक्षा समजली जाते. किशोरने देखील असंख्य अडचणींचा सामना करून या परीक्षेत यशाचा पताका फडकविताना संघर्षमय प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. अपयशाच्या काळातही खचून न जाता समर्थ्यपणे आव्हानांचा सामना केल्यानेच यशाची चव चाखता आल्याची प्रतिक्रिया किशोर ने mhgroundzero सोबत बोलताना दिली. 

 


> किशोर सादुलवार यांच्या वडिलांचा संघर्ष आणि स्वप्न ?

 कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या किशोर च्या वडिलांनी तीनही मुलांनी खूप शिकावे आणि कुटुंबाच नाव मोठे करावे असे स्वप्न पहिले होते . तीन हि मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करून वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता केली आहे. मोठा मुलगा ज्ञानेश्वर भारतीय हवाई दलात कार्यरत आहे तर मधला मुलगा अमूल हा CA असून सध्या पुण्यात कार्यरत आहे.

दोन्ही मोठ्या भावांच्या पाऊलावर पाऊल टाकत किशोर ने देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा पताका फडकावला आहे. PSI पदापर्यंत पोहचण्यासाठी किशोर ला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले असतानाही त्याचा निश्चय कधी डगमगला नाही.



> पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आणि प्रेरणा ?

वडिलांचे कष्ट आणि घरचे अठराविश्व दारिद्र्य किशोरने अनुभवले होतेच. त्यातच महाविद्यालयात शिकत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत समजले . येथूनच खरी प्रेरणा मिळाली. परीक्षेबाबत घरात सांगितल्यावर आई वडील आणि मोठ्या भावांनी उत्साहाने पाठींबा दिला. किशोर ने देखील त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना आधी पुणे येथे आणि मग नांदेड मध्ये राहून असंख्य सुखांचा त्याग करताना अविरहीतपणे अभ्यास केला. अनेक संघर्षानंतर त्याला यशाला गवसणी घालता आली.


> पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास ?

पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी किशोरने संघर्षमय प्रवास केला आहे. २०१६ साली किशोर ने अभ्यासाला सुरुवात केली. लागोलाग पहिल्याच प्रयत्नांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २०१७ साली पास केली. लागोलाग मुख्य परीक्षा पास करून मुलाखत आणि मैदानी चाचणी देखील दिली परंतु अवघ्या १२ गुणांनी यशाला हुलकावणी दिली.

२०१८ मध्ये मात्र पूर्व परीक्षा देखील उत्तीर्ण करता आली नाही.

पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करताना मात्र किशोरने २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली मात्र अवघ्या ३ गुणांनी निवड हुकली.

२०२० च्या परीक्षेत मात्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत व मैदानी चाचणीत देखील मैदान मारताना किशोर ने PSI पदाला गवसणी घातली आहे.

त्याचबरोबर २०२१ च्या मुख्य परीक्षेत देखील किशोर अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असल्याने मागास प्रवर्गातून तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची संधी त्याला असणार आहे.

 

> अभ्यास कुठे करावा ?

घरी राहूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनेक यशवंतानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा पताका रोवला आहे. त्यामुळ अमुक ठिकाण आणि क्लास चा च आग्रह न धरता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तसेच गरज वाटल्यास क्लास चा आधार घ्यायलाही हरकत नाही.



> विद्यार्थ्यांसाठी संदेश ?

विद्यार्थ्यांनी बेसिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र रज्य पाठ्य्पुस्तांचा वापर करावा. त्यानंतरच संदर्भ पुस्तकांना हात घालावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना कशाचेही दडपण न घेता अगदी मोकळेपणे अभ्यास करावा. अभ्यास नियोजनबद्ध आणि सूत्रबद्ध पद्धतीने करावा. वाचनासोबत स्वताच्या नोटस देखील तयार कराव्यात. आयोगाने घोषित केलेला अभ्यासक्रम पाहून प्रत्येक विषयाला किती महत्व द्यायचे हे ठरवावे आणि रिव्हिजन वर देखील भर द्यावा. गरज पडेल तिथे वरिष्ठ विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन देखील घ्यावे. त्याचसोबत अभ्यासामधेही विविधता ठेवावी .

एक ते दोन वर्षांत मात्र पूर्व परीक्षेत अपेक्षित यश मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात न अडकता दुसऱ्या पर्यायाकडे वळण्यास हरकत नाही. सुरुवातीलाच याबबत विचार करूनच स्पर्धा परीक्षेत प्रवेश करावा असे किशोर ने सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एकेकाळचे महाराष्ट्रातील सर्वाधिक समृध्द गाव ! अहमदनगर जिल्ह्यातील याच गावात होता अशिया खंडातील पहिला खाजगी कारखाना!

# Father Herman Bakhar# _ # अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्राचे शिल्पकार फादर हर्मन बाखर