पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

PSI Success Stories: कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या बापाचा मुलगा जिद्दीने बनला फौजदार

इमेज
  “ रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर....... डोळ्यांत जरी गेली धूळ , थांबण्यास उसंत नाही........ येतील वादळे , खेटेल तुफान तरी वाट चालतो......... अडथळ्यांना भिऊन अडखळणे , पावलांना पसंद नाही.......”            या कवी सुरेश भट यांच्या ओळी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील किशोर बंडू सादुलवार या युवकाने संघर्षाने सिद्ध केल्या आहेत. किशोर याने जिद्द , चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या आधारावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घालून कधीकाळी डोक्यावर टोकरी घेवून कुंकू करदोडे विकणाऱ्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने मिळवलेल्या यशाने संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अतिशय कठीण समजले जाते . अनेकदा आयुष्यातील अनेक वर्ष अभ्यासात घालूनही निराशा पदरी पडत असते. म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अलीकडे हुशारी पेक्षा संयम, सातत्य आणि संघर्षाची परीक्षा समजली जाते. किशोरने देखील...

देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे चित्तरंजन दास ते क्रांतिकारक अरविंद घोष यांना देशद्रोहाच्या आरोपातून निर्दोष सिध्द करणारे बँरिस्टर चित्तरंजन दास यांचा धगधगता इतिहास .

इमेज
                    इतिहासात चित्तरंजन दास यांच्या व्यक्तिमत्वाचे नानाविध कंगोरे आपल्याला दिसून येतात, त्यातील क्रांतिकारक अरविंद घोष यांच्या खटल्यातील त्यांचे काम म्हणजे समर्पण आणि बलिदानाचे उत्कृष्ट नमुनाच होता.  > कोण होते चित्तरंजन दास ?                      चित्तरंजन दास हे बंगाल मधील थोर स्वातंत्र्यसेनानी आणि कॉंग्रेस चे सक्रीय सदस्य होते.  बंगालच्या घराघरात त्यांची कीर्ती पसरलेली होती. ते स्वतः महान कायदेपंडित तथा  बँरिस्टर होते. अरविंद घोष यांच्यावर ब्रिटीश सरकारने देशद्रोहाचा खटला भरला होता तेव्हा  बँरिस्टर चित्तरंजन दास यांनी त्यांचा बचाव केला होता. बँरिस्टर चित्तरंजन दास हे कॉंग्रेस चे अध्यक्षपद भूषविलेले व्यक्तिमत्व होते.  तसेच  बँरिस्टर चित्तरंजन दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे गुरु देखील होते.  > बँरिस्टर चित्तरंजन दास आणि महात्मा गांधी  यांच्यातील संबंध              ...