Supreme Court On Maharashtra Political Crisis _ सत्तासंघार्षावरील सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अर्थ ...
गेल्या अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टात सत्तासंघार्षावरील निकालाचे वेध फक्त महाराष्ट्रातील च नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला लागलेले होते.आणि आज या बहुचर्चित खटल्याचा निकाल आलेला आहे त्याचा अर्थ आपण सोप्या भाषेत समजून घेवूयात. > महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच नेमकं प्रकरण काय ? जून २०२२ या महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला शिवसेनेच्या १५ आमदारांना सोबत घेवून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून आमदारांसह सुरत शहरात मुक्काम ठोकला होता. त्यानंतर प्रकरण गुवाहाटी पर्यंत गेले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांना परत येवून समोर बसून चर्चा करण्याचे आवाहन केले होते मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नवता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत जावून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. राज्यपालांनी यात महत्वाची आणि आग्रही भूमिका मांडली हे सर्व महाराष्ट्राने अनुभवले आहे आणि सुनावणी दरम्यान आणि आज निकाल देते वेळी देखील सुप्...